⛰️
शुभ सह्याद्री

आमच्याबद्दल (About Us)

शुभ सह्याद्री हे ग्राहक आणि विविध प्रकारच्या सेवा देणारे व्यावसायिक, सेवा पुरवठादार व स्थानिक व्यवसाय यांना एका सोप्या आणि सोयीस्कर ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे जोडण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.

आज कोणतीही सेवा शोधताना ग्राहकांना अनेक ठिकाणी चौकशी करावी लागते, वेगवेगळ्या सेवा पुरवठादारांशी संपर्क साधावा लागतो आणि उपलब्धता, किंमत, पॅकेज, सेवा व इतर पर्यायांची माहिती मिळवण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. हीच प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि सोयीस्कर करण्यासाठी शुभ सह्याद्री कार्यरत आहे.

“तुमची गरज एका ठिकाणी, योग्य सेवा योग्य पर्यायासह.”

— शुभ सह्याद्री ब्रीदवाक्य

लग्नसमारंभ, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, DJ/बेंजो, मंडप व डेकोरेशन, मेकअप आर्टिस्ट, मेहंदी, प्रवास व वाहन व्यवस्था, कार्यक्रम आयोजन, वाहतूक तसेच इतर विविध स्थानिक सेवांसाठी ग्राहक आपली गरज, ठिकाण, अंदाजे बजेट आणि आवश्यक माहिती आम्हाला सांगू शकतात. त्यानुसार संबंधित सेवा पुरवठादारांशी संपर्क साधून उपलब्धता, सेवा, पॅकेज, किंमत आणि इतर आवश्यक माहिती जाणून घेऊन ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पर्याय उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

त्याचप्रमाणे, स्थानिक व्यावसायिक आणि सेवा पुरवठादारांना त्यांच्या सेवा, व्यवसायाची माहिती, पॅकेज, कामाचा अनुभव आणि कौशल्य अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शुभ सह्याद्री एक प्रभावी डिजिटल माध्यम उपलब्ध करून देते.

विविध सेवांचे व्यासपीठ

शुभ सह्याद्री हे केवळ लग्नसमारंभापुरते मर्यादित नसून, प्रवास, कार्यक्रम, स्थानिक सेवा आणि विविध व्यवसायांना ग्राहकांशी जोडण्याच्या उद्देशाने विकसित होत असलेले डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

रायगड, मुंबई व संपूर्ण महाराष्ट्र

सुरुवातीच्या टप्प्यात रायगड जिल्हा आणि मुंबई परिसरातील निवडक सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करून काम करण्यात येणार आहे. पुढील काळात महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये या सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील.

आमचे ध्येय (Our Mission)

आमचे ध्येय

ग्राहकांची सेवा शोधण्याची प्रक्रिया सोपी करणे आणि स्थानिक सेवा पुरवठादारांना योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक विश्वासार्ह डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे.

स्थानिक व्यवसायांना नवीन ग्राहक आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच ग्राहकांना त्यांच्या जवळच्या परिसरात योग्य सेवा, योग्य पर्याय आणि आवश्यक माहिती सहज उपलब्ध करून देणे, हा शुभ सह्याद्रीचा प्रमुख उद्देश आहे.

आजच शुभ सह्याद्रीशी जोडा!

शुभ सह्याद्री — महाराष्ट्रातील स्थानिक सेवांना डिजिटल जोडणी.

Home Vendors Call Admin Track